•  

पोस्ट तपशील

Image description

हुमणी एकात्मिक व्यवस्थापन

Buy Now

उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी.नांगरट करणे पूर्व 2 दिवस अगोदर शेतात चिरमुरे (भेळी साठी वापरतात ते )एकरी 2 किलो विस्कटून टाकावेत.

नांगरट केल्यावर T आकारच्या काठया 3 ते 4 फुट उंच असणाऱ्या एकरी 15 ते 20 लावाव्यात. पशु पक्षी त्यावर बसून हुमणी चे कोष, अंडी, अळ्या वेचून खातील. मे-जून महिन्यांत पहिला पाऊस पडताच भुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुनिंब इ. झाडांवर पाने खाण्यासाठी व मीलनासाठी जमा होतात.

झाडावरील भुंगेरे रात्री ८ ते ९ वाजता बांबूच्या काठीने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडाव्यात त्यांना गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. या प्रक्रिया प्रादुर्भाव प्रक्षेत्रातील शेतक-यांनी सामुदायिकपणे केल्यास अधिक फायदा होतो.जोपर्यंत जमिनीतून भुंगेरे निघत आहेत, तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवावा.

भुगे गोळा करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. सापळ्यातील भुगे गोळा करून मारावेत. एक प्रकाश सापळा एक हेक्टर क्षेत्रास पुरेसा होतो. या उपायामुळे अंडी घालण्यापूर्वी भुंगेरेचा नाश होतो.

झाडांवर सरासरी 20 अगर त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास किंवा झाडाची पाने खालेली आढळल्यास मे-जूनमध्ये क्लोरोपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) २५ ते ३० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. फवारणीनंतर १० दिवस जनावरांना या झाडाची पाने खाऊ घालू नये.
निंदणी आणि कोळपणीच्या वेळी शेतातील अळ्या वेचून नष्ट कराव्यात. शेतामध्ये वाहते पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीतील अळ्या चे कार्य मंदावते.

जैविक नियंत्रणामध्ये परोपजीवी मित्रबुरशी मेटारायझीम अॅनीसोप्ली व सूत्रकृमी हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचा वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते. जमिनीतून फोरेट (10 टक्के दाणेदार) किंवा फिप्रोनिल (0.3 टक्के दाणेदार) 25 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे.

शेणखतामार्फत हुमणी च्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात त्यासाठी एक गाडी खतात 1 किलो 4 टक्के मॅलॅथीऑन भुकटी टाकावी.

हें सर्व मात्र एकात्मिक करावे लागेन. एका शेतकऱ्याने प्रयोग करून हुमणी नियंत्रित होत नाही.त्यास गाव व्यवस्थापन लागेल.

*अधिक माहितीसाठी संपर्क करा-*
9637667799

*फॉलो करा*

~ संदीप घोले 9168667799

सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा...!
              

  
सर्वात वाईट
वाईट
प्रामाणिक
चांगले
उत्कृष्ट

(पर्यायी)
संपर्क यादी
  भाषा बदलण्यासाठी  
संदिप प्याज बायो ऑरगॅनिक्स

आपले अँप डाउनलोड करा

नेटवर्क यशस्वीरित्या सामील झाले


डाउनलोड करा

आपले अँप डाउनलोड करा

डाउनलोड करा

तुम्ही हे पोस्ट तुमच्या नेटवर्कवर शेअर करू इच्छिता?

तुमची भाषा निवडा






बोलण्यासाठी भाषा निवडा

बोलण्यासाठी भाषा निवडा