•  

पोस्ट तपशील

Image description

अशा' रीतीने करा कांद्याची साठवण

Buy Now

संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळी कांदा काढणी सुरू आहे तर काही भागात आजुन काही दिवसांनी सुरू होईल तर कांदा साठवण करत असताना काही महत्वाच्या बाबी कडे लक्ष्य देणे गरजेचे आहे. आपला कांदा चाळीत जास्त दिवस सुरक्षित कसा राहील व त्यासाठी उपाययोजना काय कराव्या लागतील यावर चर्चा करुया.

👉कांदा काढणी

1) कांदा पिकाच्या 70 टक्के माना पडल्यावर कांदा काढणी सुरू करावी.

2) कांद्याची मान कापताना 2 इंच लांब ठेवून कापावी त्यामुळं हानिकारक कीटक व बुरशी आतमध्ये शिरकाव करत नाहीत.

3) कांदा साठवण करायची असल्यास कांद्याच्या मुळ्या कापायची गरज नाही.

👉कांदा सुकवणे

4) कांदा काढल्यानंतर पहिल्या कांद्याची पात दुसऱ्या कांद्यावर पडेल अशी व्यवस्था करावी त्यामुळं उन्हा पासून बचाव होईल. नंतर 2 दिवसांनी मान कापणी करावी.

5) कापणी केल्या नंतर 8 ते 10 दिवस शेतात कांदा छोट्या डीघाऱ्या खाली किंवा वळही लावून ठेवावा त्यामुळं कांद्या मध्ये असणारा ओलसर पणा निघून जाईल आणि कोरडा कांदा चाळीत भरल्या मूळ
काजळी लागणार नाही.

👉कांद्याचे प्रतवारीनुसार साठवण
कांद्याच्या आकारमानाचा परिणाम कांद्याच्या साठवणीवर होतो.

6) कांदा चाळीत भरताना निवड पद्धतीने भरावा ते करत असताना मोठा आणि मध्यम प्रकारातील कांदा एकत्र भरावा आणि लहान कांदा वेगळा ठेवावा त्यामुळं कांदा चाळीत हवा खेळती राहील.

👉चाळीची रचना

7) एक पाकी कांदा चाळ असेल तर दक्षिण- उत्तर ही दिशा असावी, त्याची रुंदी साडेचार फूट व उंची पाच फूट ठेवावी लांबी गरजेनुसार असावी. दोन पाकि चाळ असेल तर पूर्व पश्चिम दिशा असावी. त्यांची पण रुंदी व उंची तीच असावी.

👉कांदा साठवणूक करताना घ्यावयाची काळजी

😎 कांदा चाळीत भरण्या अगोदर आपली चाळ निर्जंतुक करून घ्यावी त्यासाठी काब्रोर्डेझीम व क्लोरोपायरीफॉस ची फवारणी तीन दिवस अगोदर करावी.

9) कांदा भरताना कोसावेट DF-1 ते 2 किलो व BHC पावडर 1 ते 2 किलो याचा अंदाजे 10 टन कांद्यासाठी वापर करावा. त्यामुळं काजळी व हानिकारक किटकापासून चाळीत बचाव होईल..

वरील बाबी च नियोजन केल्यास कांदा जास्त महिने चाळीत सुरक्षित राहू शकतो.

अधिक माहीतीसाठी संपर्क 📲-
9637667799

फॉलो करा

~ मा. श्री.संदीप घोले 9168667799 (राष्ट्रपती पुरस्कृत शेतकरी)

सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा...!
              

  
सर्वात वाईट
वाईट
प्रामाणिक
चांगले
उत्कृष्ट

(पर्यायी)
संपर्क यादी
  भाषा बदलण्यासाठी  
संदिप प्याज बायो ऑरगॅनिक्स

आपले अँप डाउनलोड करा

नेटवर्क यशस्वीरित्या सामील झाले


डाउनलोड करा

आपले अँप डाउनलोड करा

डाउनलोड करा

तुम्ही हे पोस्ट तुमच्या नेटवर्कवर शेअर करू इच्छिता?

तुमची भाषा निवडा






बोलण्यासाठी भाषा निवडा

बोलण्यासाठी भाषा निवडा