•  

पोस्ट तपशील

Image description

कांदा काढणी ची योग्य वेळ आणि त्यानंतरचे व्यवस्थापन

Buy Now

रब्बी हंगामातील कांदा लागवड नोव्हेंबर महिन्या पासून ते १५ जानेवारीपर्यंत सुरू राहते. लागवडीच्या काळावरती व नंतरच्या वातावरणावरती कांदा कोणत्या महिन्यानंतर परिपक्व होणार हे ठरते.परंतु साधारणपणे पुनर्लागवड केल्यापासून 110 ते 120 दिवसांत कांद्याची काढणी होते.

नोव्हेंबर ते डीसेंबर महिन्याचा लागवड काळ असेल तर 110 ते 120 दिवसात कांदा काढणीस येतो.परंतु जानेवारीत पुनर्लागवड केली तर मात्र मार्चमध्ये ऊन जास्त वाढल्यामुळे लागवडी पासून ९० ते १०० दिवसांत कांदा काढणीस येतो.

कांद्याची सरासरी ७०% मान पडल्यावर कांद्याची काढणी करावी. कांद्याची संपूर्ण पात जळून गेल्यावर कांद्याची काढणी केल्यास साठवण काळवर विपरीत परिणाम होतो. कारण उन्हाची तीव्रता कांद्याच्या उघड्या भागावर पडते आणि तेथून पुन्हा सड सुरू होते,रंग पांढरा पडतो.कांद्याची काढणी करताना त्याची मान दोन इंच लांब कापावी त्यामुळं बुरशी व मावा आत मध्ये शिरकाव करत नाही.

फुटीचे कांदे (जोड कांदे )खराब झालेले कांदे कांदा काढणी करतानाच वेगळे करावेत त्यामुळे चांगल्या कांद्याला इजा होत नाही.अंदाजे 100 किलो चे छोटे ढिगारे किंवा लांब वळई करून कांद्याच्या पातीनी 10 ते 15 दिवस शेतातच झाकून ठेवावी. त्यामुळे कांद्यामधील ओलावा कमी होऊन काजळीसारख्या बुरशीची वाढ होत नाही, मुळ्या ना लागलेली माती शेतातच गळून पडते त्यामुळं कांदा चाळीतील साठवण काळ वाढण्यास मदत होते..

अधिक माहितीसाठी संपर्क 📲-
9637667799

फॉलो करा

~ मा. श्री.संदीप घोले 9168667799 (राष्ट्रपती पुरस्कृत शेतकरी)

सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा...!
              

  
सर्वात वाईट
वाईट
प्रामाणिक
चांगले
उत्कृष्ट

(पर्यायी)
संपर्क यादी
  भाषा बदलण्यासाठी  
संदिप प्याज बायो ऑरगॅनिक्स

आपले अँप डाउनलोड करा

नेटवर्क यशस्वीरित्या सामील झाले


डाउनलोड करा

आपले अँप डाउनलोड करा

डाउनलोड करा

तुम्ही हे पोस्ट तुमच्या नेटवर्कवर शेअर करू इच्छिता?

तुमची भाषा निवडा






बोलण्यासाठी भाषा निवडा

बोलण्यासाठी भाषा निवडा